Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना लावली होती हजेरी

कोल्हापूर : सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना लावली होती हजेरी

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

कोल्हापूर शहरातील पार्किंग स्पॉटबाबत शुक्रवारी पाटील यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील 15 स्पॉटचे क्रिडाईच्या वतीने सादरीकरण करण्यात आले होते. यापैकी आरक्षण असलेल्या जागा ताब्यात घेण्याबाबत तीन जागाधारकांसमवेत अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -