Friday, November 22, 2024
Homeदेश विदेश1 फेब्रुवारीपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

1 फेब्रुवारीपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

या नवीन वर्षाचा पहिला महिना संपत आला आहे. तीन दिवसांनंतर फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून तुमच्या आयुष्याशी संबंधइत अेक नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य, व्यापारी वर्ग, करदात्याला मोठ्या अपेक्षा आहेत. पण हा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलू शकतात. 1 फेब्रुवारीपासून फक्त एलपीजी सिंलेडरच्या किमती बदलणार नाही तर बँकेशीसंबंधित काही नियमही बदलणार आहेत. या नियमांमधील बदलांविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे…

SBIचे नियम बदलणार –
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयएमपीएसद्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत मनी ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​चार्ज लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाखांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने आयएमपीएसच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.

बँक ऑफ बडोदाचे नियम बदलणार –
1 फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाच्या नियमामध्ये बदल होणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांच्या चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टमचे पालन करावे लागणार आहे. याचा अर्थ चेकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागेल त्यानंतरच चेक क्लिअर होईल. पण हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी असेल.

PNBचे नियम बदलणार –
1 फेब्रुवारीपासून पंजाब नॅशनल बँकचे नियम बदलणार आहे. पीएनबीचे जे नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता किंवा गुंतवणूक फेल झाल्यास तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत हा दंड 100 रुपये होता. यापुढे तुम्हाला दंड म्हणून 150 रुपये जास्त भरावे लागणार आहे.

LPG सिलेंडरची किंमत –
एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. यावेळी 1 फेब्रुवारी 2022 रोजी सिलिंडरच्या किमती वाढतात की कमी होतात हे पाहावे लागेल.

1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराशी संबंधित नियमांमध्ये बदल होऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -