Thursday, February 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : झारीतल्या शुक्राचार्यांमुळे मटका, जुगार खुलेआम सुरू !

कोल्हापूर : झारीतल्या शुक्राचार्यांमुळे मटका, जुगार खुलेआम सुरू !

झारीतल्या शुक्राचार्यांमुळे काळे धंदेवाल्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. तीन पानी जुगार अड्ड्यांसह मटका आणि दारू तस्करीतून रोज शंभरावर कोटीच्या उलाढाली झडू लागल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी हद्दपार झालेल्या काळ्या साम्राज्याचे आस्तित्व ठळकपणे जाणवू लागले आहे.

वरिष्ठांच्या आदेशाला कोलदांडा देत शहर, जिल्ह्यात स्थानिक स्तरावर काळे धंदेवाल्यांची पिलावळ पोसण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.गतवर्षी लॉकडाऊन असतानाही डिसेंबर 2021 अखेर जुगार आणि दारू तस्करीत 3 हजार 713 गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. आता तर अनलॉकमध्ये सारेच ‘खुल्‍लमखुल्‍ले’ सुरू झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातून अलीकडच्या काळात तडीपार झालेल्या अनेक नामचीन टोळ्यांचा जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. कोल्हापूर शहर, उपनगरांसह इचलकरंजी व ग्रामीण भागात सराईत स्थिरावले आहेत. राजकीय हितसंबंध आणि झारीत दडलेल्या कच्च्या दुव्यांना हाताशी धरून गल्‍लीबोळातही मटक्याच्या टपर्‍या सुरू झाल्या आहेत. साडेचारशेवर जुगारी क्लबमध्ये पिसण्या सुरू झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -