उद्या अर्थमंत्री निर्मला सितारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान अर्थव्यवस्थेला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम हा शेअरमार्केटवर देखील झाल्याचे पहायाला मिळत आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच शेअर बाजाराने 2 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. गेल्या दोन आठवड्यांपासून देशांतर्गत शेअर बाजारावर विक्रीचा दबाव आहे. मात्र, हा आठवडा बाजारासाठी चांगला जाण्याची शक्यता आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, उद्या अर्थमंत्री निर्मला सितारामण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेअर बाजाराला देखील अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत. या अपेक्षेनुसार बजेट राहिल्यास या आठवड्यात शेअरबाजारातील घोडदौड कायम राहील.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -