ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोल्हापूर : कदमवाडी येथील साक्षी मोहन कमते या युवतीने रेखाटलेल्या मेहंदीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.भारतातील सर्वात मोठी मेहंदी रेखाटल्याबद्दल तिचा हा सन्मान झाला असून कोल्हापूरसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
Sakshi ला बालपणापासून मेहंदी काढण्याचा छंद आहे. वडील मोहन कमते यांचे गॅरेज आहे. Sakshi विवेकानंद महाविद्यालयात बीएससीमध्ये शिकते. तिला वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, पाककला, नृत्याची आवड आहे. लॉकडाऊन काळात काही वेगळं करण्याच्या उद्देशाने तिने मेहंदीचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा निश्चय केला.
त्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे ऑनलाईन अर्ज केला. तिने २७ ऑक्टोबरला ६ बाय ८ आकाराच्या पांढऱ्या कागदावर मेहंदी काढायला सुरुवात केली. तब्बल ९ ते १० तास बसून तिने दिलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी हे काम पूर्ण केले व याचा व्हिडिओ संस्थेकडे पाठवला. एक महिन्याने तिला अभिनंदनाचे पत्र पाठवण्यात आले व काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड झाल्याची प्रत व अवॉर्ड पाठवण्यात आले.
Sakshi च्या मेहंदीची इंडिया बुकमध्ये नोंद, भारतातील सर्वात मोठी मेहंदी रेखाटली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -