आजच्या घडीला जगात जवळपास आपण सर्वजण जीमेलचा वापरत करतो. जीमेल आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. जीमेलही बदलत्या काळानुसार कात टाकत आहे. अशातच आता गुगलने जीमेल वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. लवकरच आपल्याला जीमेलचे स्वरूप बदललेले दिसेल. गुगलने नुकतीच घोषणा केली आहे, की ते जीमेलचे नवीन डिझाइन आणणार आहेत. नवीन डिझाइन कंपनीच्या गुगल वर्कस्पेसच्या नवीन प्लॅन अंतर्गत आहे, ज्यामध्ये जीमेल चॅट, गुगल मीट आणि गुगल स्पेसला एकाच विंडोमध्ये आणले जाईल. म्हणजेच गुगलच्या बाकीच्या सेवा जीमेलवरूनच वापरता येणार आहे. यासाठी वेगळे अॅप उघडण्याची गरज नाही.
गुगलच्या वर्कप्लेस ब्लॉग पोस्टनुसार, वर्कस्पेस वापरकर्ते 8 फेब्रुवारीपासून जीमेलच्या नवीन इंटीग्रेटेड व्ह्यूची टेस्टिंग करू शकतात.जीमेलच्या नवीन लेआउटमध्ये, वापरकर्त्यांना चार बटण पर्याय दिले जातील, ज्यामुळे वापरकर्ता जीमेलवरून मेल,चॅट, स्पेस आणि गुगल मीटवर शिफ्ट करू शकेल. याचा अर्थ जीमेल, चॅट आणि गुगल मीटसाठी एकच एकत्रित लेआउट असेल.गुगल 2022 च्या यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत जीमेलमध्ये इंटिग्रेटेड व्ह्यू हे फिचर आणणार आहे. जूनपूर्वी जीमेल वापरकर्त्यांना जीमेलचा नवीन यूजर इंटरफेस मिळेल.