Taji Batmi online tim
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ग्रॅज्युएट एप्टीट्यूट टेस्ट इन इंजिनिअरींग अर्थात गेट- 2022 ही परिक्षा पुढे ढकलण्यात यावी. अशी सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ही याचिका फेटाळून लावली. आयआयटी, खरगपूरला जर परिक्षा पुढे ढकलायची असेल तर ते तसा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत, असेही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने स्पष्ट केेले. (गेट परीक्षा)
कोरोना संकटामुळे गेट परिक्षा पुढे ढकलण्याच्या विनंतीच्या असंख्य याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. परिक्षा तोंडावर असल्यामुळे याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची विनंती सरन्यायाधीशांनी मान्य केली होती. त्यानुसार ही सुनावणी झाली. गेट परिक्षा 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोविड संकटामुळे अनेक राज्यांतील शाळा, महाविद्यालये बंद आहेत तर काही ठिकाणी संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत परिक्षा पुढे ढकलल्या जाव्यात, अशा विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती
गेट 2022 परीक्षा रद्द केली जाणार नाही : सर्वोच्च न्यायालय
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -