Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रRAIGAD जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना येणार देखणे रूप; 20 कोटी निधी मान्यता

RAIGAD जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना येणार देखणे रूप; 20 कोटी निधी मान्यता

ताजी बातमी ऑनलाइन टीम

Raigad: शासनाकडून (Government) जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी तब्बल 45 कोटी 80 लाख 56 हजार रुपये निधीस (Fund) प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील रुपये 19 कोटी 55 लाख 99 हजार इतका निधी वितरणासाठी (Distribute) नुकतीच मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे प्रयत्नांतून हा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 31 जानेवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन 2021_22 मध्ये करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरावरील नवीन कामांना मान्यता देवून शासनाने निधी वितरणास मान्यता दिली आहे.

रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला 240 किमीचा समुद्र किनारा व निसर्गसंपदा लाभली आहे. तसेच प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक स्थळे देखील आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी, येथील स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.



निधीचे वितरण

1) मौजे मालाडे येथे श्री मारुती मंदिर सुशोभिकरण करणे, ता.अलिबाग – (रु.20 लक्ष),

2) खांडस येथील शिवमंदिर परिसर सुशोभिकरण करणे ता.कर्जत – (रु.20 लक्ष).

3) साजगाव पुरातन विठ्ठल मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, ता. खालापूर – (रु.20 लक्ष),

4) कडाव गणपती मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, ता.कर्जत – (रु.20 लक्ष),

5) उन्हरे कुंड येथील इमारतीचे सामाजिक सभागृह बांधणे, ता. सुधागड – (रु. 25 लक्ष)

6) ग्रामपंचायत नेरळ येथील सुशोभिकरण करणे – (रु.30 लक्ष)

7) ग्रामपंचायत नेरळ येथील गणेश घाट येथे आर.सी.सी संरक्षक भिंत बांधणे – (रु.27 लक्ष)

8) ग्रामपंचायत नेरळ येथे (माथेरान पायथ्याशी) असलेले हुतात्मा स्मारक सुशोभिकरण व दुरुस्ती करणे (रु.20 लक्ष)

9) भिवपुरी येथील अहिल्यादेवी होळकर तलावाकडून हुमगावकडे जाणारा रस्ता तयार करणे (भाग 1 ते भाग 7), मौजे भिवपुरी (टाटा कॅम्प) येथील अहिल्याबाई होळकर तलाव परिसरातील रस्त्यांची सुधारणा करणे (भाग 1 ते भाग 7), मौजे गोळवाडी येथील पुरातन तलाव व अंबोट रस्त्याची सुधारणा करणे (भाग 1 ते भाग 7) – (रु.60 लक्ष)
10) डॉ.सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र, किहीम, ता.अलिबाग येथील विकास कामे – (रु.60 लक्ष)

11) मौजे उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थळ व परिसराचे सुशोभिकरण करणे ता. पोलादपूर – (रु.1 कोटी 50 लक्ष)

12) मौजे साखर येथील श्री सूर्याजी मालुसरे यांचे समाधी स्थळ व परिसराचे सुशोभिकरण करणे ता. पोलादपूर – (रु.45 लक्ष)

13) मौजे घागरकोंड येथील झुलत्या पुलाचे बांधकाम करणे, ता.पोलादपूर – (रु.75 लक्ष)

14) दिवेआगर येथे कासव संवर्धन प्रकल्प उभारणे, ता.श्रीवर्धन – (रु.1 कोटी 50 लक्ष)

15) दिवेआगर येथे पर्यटन मार्केट सुविधा तयार करणे, ता.श्रीवर्धन – (रु.1 कोटी)

16) हरिहरेश्वर येथे सभामंडप, बैठक व्यवस्था सेल्फी पॉइंट तयार करणे, ता.श्रीवर्धन – (रु.1 कोटी),

17) दर्या सारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभीकरण करणे (टप्पा 1 व 2), ता.अलिबाग – (रु.35 लक्ष)

18) तळा महादेव तलाव परिसराची पर्यटनदृष्ट्या सुधारणा करणे, ता.तळा – (रु.30 लक्ष),

19) द्रोणागिरी डोंगर या पर्यटनस्थळाचा विकास करणे, ता.तळा – (रु.1 कोटी 50 लक्ष),

20) रायगड जिल्ह्यातील (Raigad District) विविध भागात शिल्पांची निर्मिती व उभारणी करणे (तिबोटी खंड्या-रायगड जिल्हा पक्षी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, खेकडा, कोळंबी, कासव व बोटीसह कोळी यांचे शिल्प) – (रु.2 कोटी 92 लक्ष 32 हजार)

21) रोहा येथील हनुमान मंदिर परिसराचे सुशोभिकरण करणे, ता.रोहा – (रु.75 लक्ष),

22) आक्षी, ता.अलिबाग येथील शिलालेख परिसराचे सौंदर्यीकरण करणे – (रु.14 लक्ष 40 हजार),
23) श्रीवर्धन समुद्र किनारी अस्तित्वात असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुशोभिकरणाची कामे करणे – ता.श्रीवर्धन – (रु.1 कोटी 91 लक्ष 9 हजार),

24) मोर्बा येथील गाव तलावाचे सुशोभिकरण व सुधारणा करणे, ता.माणगाव – (रु.1 कोटी 50 लक्ष),

25) शिवथरघळ येथे मंदिराच्या मागील बाजूस गॅबियन वॉल (संरक्षक भिंत) बांधणे – (रु.30 लक्ष),

26) उंबरखिंड येथील शिवतीर्थ समरभूमी विकास कामे, ता.खालापूर – (रु. 50 लक्ष),

27) रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग पोलीस परेड मैदानात पोलीस मित्र शिल्प उभारणे – (रु.15 लक्ष 68 हजार)

जिल्ह्याचा विविध क्षेत्रातील विकास साधण्यासाठी पालकमंत्री या नात्याने सतत कार्यरत आहे. जिल्ह्यातील विविध विषयांबाबतच्या विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी राज्य शासनाकडून नेहमीच सहकार्य मिळत आले आहे. याकरिता राज्य शासनाचे विशेष आभार.

– अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री, रायगड

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -