ताजी बातमी ऑनलाईन टीम
कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिला बचत गट व विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली. तसेच, प्रधानमंत्री विमा योजनेच्या नावाने कोरोनाग्रस्त मयतांच्या कुटुंबियांना बनावट फॉर्म देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार 50 रुपये घेऊन 182 जणांना गंडा घातला.याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शहापूर टोलनाका येथे सापळा रचून एकाला अटक केली आहे.
विकास रघुनाथ बांदल (वय 35, रा. नर्हे, आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विलास वामन पाटील (रा. खराळवाडी, पिंपरी) याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात 24 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास बांदल याने तिरुपती कार्पोरेशन अँड जीवन संजीवन ग्रुप संस्थेची स्थापना करून आकुर्डी येथे मे ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत कर्ज मंजूर करून देण्याचे सांगून काही जणांशी संपर्क साधला.
स्वाभिमानी फायनान्समार्फत आठ महिला बचत गटांना कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून प्रत्येक गटाकडून 46 हजार 800 असे एकूण तीन लाख 74 हजार 400 रुपये घेतले.
बचत गटांना लाखोंचा गंडा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -