Friday, September 20, 2024
Homeतंत्रज्ञानमेटा भारतात Facebook आणि Instagram बंद करणार?

मेटा भारतात Facebook आणि Instagram बंद करणार?

मेटाने 2022 च्या नवीन अटी स्वीकारणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे, परंतु जर डेटा ट्रान्सफर सुविधा उपलब्ध नसेल तर फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक सेवा बंद कराव्या लागतील. आत्तापर्यंत मेटा ही कंपनी अमेरिकन सर्व्हरवर युरोपातील युजर्सचा डेटा साठवून ठेवत होती. परंतु नवीन अटींमध्ये डेटा शेअर करणे प्रतिबंधित आहे.

मेटाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला सांगितले आहे की, शक्य तितक्या लवकर सर्व्हिससाठी नवीन फ्रेमवर्क विकसित न केल्यास युरोपमधील युजर्ससाठी त्यांची सेवा बंद करावी लागेल. EU (युरोपियन युनियन) कायद्यानुसार, युजर्स डेटा अमेरिकेत असू नये, तर META कंपनी युजर्सचा डेटा शेअर करण्याची परवानगी मागत आहे. झुकेरबर्गला युरोपमधील युजर्सचा डेटा अमेरिकन सर्व्हरवरही साठवून ठेवायचा आहे.

यापूर्वी, प्रायव्हसी शील्ड (Privacy Shield) कायद्यांतर्गत युरोपियन डेटा यूएस सर्व्हरवर हस्तांतरित केला जात होता, परंतु जुलै 2020 मध्ये युरोपियन न्यायालयाने हा कायदा रद्द केला होता. प्रायव्हसी शील्ड व्यतिरिक्त, मेटा यूएस सर्व्हरवर युरोपियन युजर्सचा डेटा स्टोर करण्यासाठी Standard Contractual Clauses कराराच्या कलमांचा देखील वापर करत आहे, परंतु युरोपसह अनेक देशांमध्ये याची देखील चौकशी सुरू आहे.

मेटाकडून केवळ युरोपातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद करण्याविषयीचं विधान समोर आलं आहे. त्यामुळे जरी डेटा शेअरींग प्रकरणावरुन कंपनी आणि तिथल्या प्रशासनाचं बिनसलं तरी फेसबुक आणि इन्स्टाग्राम केवळ युरोपात बंद होऊ शकतं. कंपनीच्या भारतातील सेवेवर त्याचा काही परिणाम होणार नाही. मात्र भारतीय युजर्सच्या डेटाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि कंपनीला त्यावर उत्तर द्यावं लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -