शिळं अन्न खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर एखाद्या व्यक्तीने शिळं अन्न खाल्लं तर त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. 12 तासांनंतर कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ नये. कारण त्यामुळे पोटाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. अनेकांचे जेवण भाकरी खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. बर्याच लोकांना चपाती खायला आवडते पण जर तुम्ही शिळ्या चपातीचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते. आज आपण शिळी चपाती खाल्ल्याने काय नुकसान होते हे जाणून घेणार आहोत…
उलटी होऊ शकते
शिळी चपाती खाल्ल्याने उलट्या होतात. कारण शिळ्या चपातीमध्ये किंवा शिळ्या अन्नामध्ये असलेले बॅक्टेरिया पोटात जाऊन हानिकारक रसायने बनवण्यास सुरुवात करतात. त्यामुळे पोटाशी संबंधित आजारही होऊ शकतात.
अन्नाची विषबाधा होऊ शकते
शिळ्या चपातीचे सेवन केल्यास अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे उलट्यांसह जुलाबाच्या तक्रारी होऊ शकतात.
अपचनाचा त्रास होऊ शकतो
शिळ्या चपातीमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात. त्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शिळ्या चपात्या खाल्ल्यानेही अपचन होऊ शकते. तसेच ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांनी शिळ्या चपातीचे सेवन अजिबात करू नका.