Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात या टोळीवर मोक्का कारवाई

कोल्हापुरात या टोळीवर मोक्का कारवाई

ताजी बातमी ऑनलाइन टीम


तळवडे या ठिकाणी नोव्हेंबर, २०२१ मध्ये आण्णा गॅगने सशस्त्र दरोडा टाकला होता. या प्रकरणी पोलीसांनी तपास करून ९ जणांना अटक केली होती. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा, लुटमारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.

मंदार तानाजी चोरगे (वय ३४ रा. कात्रज,पुणे), सचिन रामचंद्र नाचनकर (वय ३७ रा. कोतोली ता. शाहूवाडी), शिवाजी हरीबा कदम (वय ३६ रा.अमेणी, शाहूवाडी), नामदेव उर्फ अविनाश जालिंदर कदम (वय २६ रा. पाडळेवाडी ता. शिराळा), शुभम उर्फ सोन्या शंकर चोरगे (वय २२ रा.वाटंगी, पुणे), विशाल उर्फ आल्लया अरुण वाल्हेकर (रा.पुणे), लक्ष्मण आण्णा जाधव (रा. दिघी पुणे), सुरज बर्डे, ओंकार उर्फ तेड्या अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -