Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रधारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड, नागरिकांना दमबाजी, पाच गुंड पोलिसांच्या ताब्यात

धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड, नागरिकांना दमबाजी, पाच गुंड पोलिसांच्या ताब्यात

हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार कार नाशकात उघडकीस आला होता. या प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. जवळपास दहा ते बारा गाड्यांच्या काचा फोडत हे टोळकं परिसरात लोकांना दमबाजी करत होतं. धक्कादायक म्हणजे या टोळक्यांपैकी एक जण अल्पवयीन आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्ववादातून सिडको परिसरातली गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस आता कधी आपला खाक्या दाखवणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.

नाशिकच्या सिडको परिसरामध्ये हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हातात कोयते-तलवारी नाचवत गुंडांच्या एका टोळक्याने भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्ववादातून सिडको परिसरातली वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी आव्हान ठरत असल्याने पोलीस आता कधी आपला खाक्या दाखवणार याची प्रतीक्षा आहे.

अचानक रस्त्यावर आलेल्या या टोळक्‍यामुळे नागरिकांची पळापळ तर झालीच, मात्र जवळपास दहा ते बारा गाड्यांच्या काचा फोडत हे टोळकं परिसरात लोकांना दमबाजी करत फिरत राहिलं. पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -