ताजी बातमी ऑनलाइन टीम
शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या (ऑक्टोबर, नोव्हेंबर) परीक्षा सोमवारपासून (दि.14) सुरू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात तंत्रज्ञान विभागाच्या बी.टेक.च्या परीक्षा दोन सत्रांत होणार असून 500 हून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांकडून 664 अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. कार्यक्षेत्रातून 2 लाख 20 हजार विद्यार्थी परीक्षा देतील. यात विद्यापीठाकडून 362 परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. महाविद्यालय व क्लस्टर पद्धतीने काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अगोदर सुरू झाल्या आहेत. त्या 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत
बी.व्होक, बी.कॉम. आयटी, बी.कॉम. बँक मॅनेजमेंट, बी.कॉम.-बिझनेस मॅनेजमेंट, बीएस्सी-बायोटेक, बीएस्सी-शुगरटेक, बीएस्सी- अॅनिमेशन, बीएस्सी-फॉरेन्सिक सायन्स, बीएस्सी-फूड प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी तांत्रिक अडचणीसाठी विद्यापीठाच्या कॉल सेंटर, हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर.पळसे यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठ हिवाळी सत्र ऑनलाईन परीक्षा उद्यापासून
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -