Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनइंस्टाग्रामवर 40 कोटी फॉलोअर्स असलेला Cristiano Ronaldo पहिलाच, Virat Kohli 16 व्या...

इंस्टाग्रामवर 40 कोटी फॉलोअर्स असलेला Cristiano Ronaldo पहिलाच, Virat Kohli 16 व्या क्रमांकावर; जाणून घ्या कोण कोणत्या नंबरवर

ताजी बातमी ऑनलाइन टीम
Instagram Top 10 Followers List जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या Cristiano Ronaldo च्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. पोर्तुगाल आणि मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू Cristiano Ronaldo ने इंस्टाग्रामवर 400 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. असा पराक्रम करणारा Cristiano Ronaldo हा जगातील पहिलाच व्यक्ती आहे. इंस्टाग्रामचे अधिकृत अकाऊंट वगळता ख्रिस्तियानो हा सर्वाधिक फॉलो केला जाणारा व्यक्ती आहे.ख्रिस्तियानो रोनाल्डोने रविवारीच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला आणि एका दिवसानंतर हा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला.

रियालिटी टीव्ही स्टार आणि काइली कॉस्मेटिक्सची कायली जॅनर Cristiano नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. Kylie Jenner चे 309 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे. पॅरिस सेंट जर्मेनकडून खेळणाऱ्या लिओनेल मेस्सीचे इन्स्टाग्रामवर 306 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

अमेरिकन गायिका आणि हॉलिवूड सेलिब्रिटी सेलेना गोमेझ चौथ्या क्रमांकावर आहे. सेलेना गोमेझचे इंस्टाग्रामवर 295 मिलियन फॉलोअर्स आहेत.

पाचव्या क्रमांकावर अमेरिकन अभिनेता ड्वेन द रॉक जॉन्सनचा क्रमांक येतो. रॉक जॉन्सनचे 295 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

यानंतर अमेरिकन गायिका एरियाना ग्रांडेचा नंबर लागतो. सहाव्या क्रमांकावर असलेल्या एरियाना ग्रांडेचे इंस्टाग्रामवर 294 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन सातव्या क्रमांकावर आहे. किम कार्दशियनचे 285 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

या यादीत अमेरिकन गायिका बियॉन्से आठव्या क्रमांकावर आहे. बियॉन्सेच्या फॉलोअर्सची संख्या 237 दशलक्ष आहे.

गायक जस्टीन बीबर 9व्या क्रमांकावर आहे. जस्टिन बीबरचे 22 कोटी फॉलोअर्स आहेत.

किम कार्दशियनची बहीण ख्लो कार्दशियन या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. ख्लो कार्दशियनचे तिच्या इंस्टाग्रामवर 219 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

या यादीत विराट कोहली 16 व्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 182 मिलियन फॉलोअर्स आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -