Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनमगरीच्या गळ्यात ६ वर्षांपासून अडकला होता दुचाकीचा टायर; या पठ्ठ्याने दाखवली हिंमत...

मगरीच्या गळ्यात ६ वर्षांपासून अडकला होता दुचाकीचा टायर; या पठ्ठ्याने दाखवली हिंमत अन्…

ताजी बातमी ऑनलाईन टीम
एका मगरीच्या गळ्यात दुचाकीचा टायर अडकला होता. गेल्‍या सहा वर्षांपासून हा टायर गळ्यात अडकून राहिल्‍यान मगरीची दयनीय अवस्‍था झाली होती. गळ्यात अडकलेल्‍या टायरसह जगण्याची वेळ या मगरीवर आली होती. मात्र एका धाडसी व्यक्‍तीने मगरीच्या गळ्यातील अडकलेला टायर काढून मगरीला मोकळा श्वास मिळवून दिला. यामुळे या व्यक्‍तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तिली (३५ वर्षीय) नावाच्या व्यक्‍तीने या मगरीला पकडले. तो म्‍हणाला मी यासाठी लोकांकडे मदत मागितली. मात्र सर्व लोक भयभीत झाले होते. मगरीला पकडण्यासाठी जाळ टाकलं. चारा म्‍हणून बदक आणि कोंबडीचाही वापर केला. पण मगर या जाळ्यातून दोन वेळा निसटली. तिसऱ्या वेळी मात्र मगरीला जाळ्यात अडकवण्यात यश आले. तिली तीन आठवड्यांपासून या मगरीला पकडण्याचा प्रयत्‍न करत होताे.

तिलीने मगरीला पकडले आणि एका छोट्याशा करवतीच्या साह्याने ६ वर्षांपासून मगरीच्या गळ्यात अडकलेली दुचाकीची टायर कापून तिला मोकळे केले. मगरीच्या गळ्यात टायर अडकल्‍याने स्‍थानिक लोकांनाही याची चिंता लागली होती, कारण जसजसा मगरीचा आकार वाढत जाईल तसा टायरमुळे मगरीचा जीव गुदमरु शकतो. मात्र तिलीने तिला या फासरूपी टायरच्या त्रासातून मुक्‍त केलं. यामुळे स्‍थानिक नागरिकही तिलींवर खुश झाले.

जानेवारी २०२० मध्ये सेंट्रल सुलावेसीच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी मगरीची टायरमधून सुटका करणाऱ्या व्यक्‍तीला बक्षीस देण्याची घोषणा केली होती. आता तिली हे बक्षीस घेतात की नाही हे पाहणे महत्‍वाचे आहे. कारण ते फक्‍त प्राण्यांची मदत करण्यातच आपली धन्यता मानतात. तिली यांनी याआधीही मगर, साप तसेच अनेक जंगली प्राण्यांना वाचवून त्‍यांना त्‍यांच्या नैसर्गिक अधिकासात सुरक्षित सोडले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -