सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर जिल्ह्यातील शर्यत प्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. ग्रामीण अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा या उत्साहाचे वातावरण आहे. या बैलगाडा शर्यत सुरु झाल्यामुळं जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजू लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल खरेदी विक्री बाजारात पुन्हा एकदा लाखोरुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या(Maharashtra) कानाकोपऱ्यातून बैलांची विक्री करण्यासाठी शेतकरी येत आहेत. अश्याच प्रकारे मावळ तालुक्यातील ओतूरमधील शेतकऱ्याच्या शर्यतीच्या बैलाची तब्बल 25 लाखांना विक्री झाली आहे.
बैलगाडा शर्यत ही अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ओतुर येथील शेतकरी प्रमोद डुबंरे याच्या बंजरग बैलाने मावळ येथे भरलेलया बैलगाडा शर्यतीत कमल करू दाखवली होती बैलाने शर्यतीत केलेल्या कामगिरीचे बैलगाडा प्रेमींमध्ये आकर्षण होते. अनेकांच्या मनात या बजरंगने घर केले होते. बजरंग बैलाचे देखणे रूप व दौड बैलगाडा शौकीन त्याच्यावर खुश होते. त्यानंतर उद्योजक व प्रसिध्द गाडा मालक किशोर दांगट व बबन दांगट या बंधुनी या बैलाची खरेदी केली ती चक्क” 25 लाखाला.त्यानी प्रथम 19 लाखाला डुबंरे यांचेकडे मागणी केली होती.परंतु डुबंरे यानी या व्यवहाराला नकार दिला.त्यानंतर दांगट यानी तब्बल 25 लाखाला रूपये देऊन बैलाची खरेदी केली आहे.