ताजी बातमी ऑनलाइन टीम
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाचे दु:ख कमी होत नाही तितक्यात बॉलिवूडमधून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज सिंगर आणि म्युझिक कम्पोझर बप्पी लहिरी (Bappi Lahiri Died) यांनी जगाचा निरोप घेतला. बप्पीदांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये बप्पीदांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पीदांच्या निधनाने (Bappi Lahiri Death) संपूर्ण देश पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला आहे.
बप्पींदाच्या पार्थिवावर उद्या (गुरुवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबत लहरी कुटुंबीयांनी माहिती दिली आहे. बप्पी लहरी यांचा मुलगा बप्पा अमेरिकेत असून त्याची प्रतिक्षा केली जात आहे. बप्पा उद्या दुपारपर्यंत भारतात पोहोचेल.
त्यानंतर बप्पीदांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. ‘आमच्यावर ओढवलेला हा प्रसंग फार गंभीर आहे. सगळ्यांचे आवडते बप्पीदा काळाच्या पडद्याआड गेले आहेत. उद्या दुपारी बप्पा हा लॉस एंजेलिसहून देशात परत येईल. त्यानंतर बप्पी लहरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या आत्मास शांती मिळो, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहेत.’ अशी माहिती श्रीमती लहरी, गोबिंद बंसल, बप्पा लहरी, रेमा लहरी, यांनी दिली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर वायरल भयानी यांनी लहरी कुटुंबीयांचे निवेदन आपल्या वॉलवर शेअर केले आहे.
बप्पी लहिरी यांचा उद्या होणार अंत्यसंस्कार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -