Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगGold Rate : सोन्याला पुन्हा झळाळी! एक वर्षानंतर सोन्याचे दर पुन्हा 50...

Gold Rate : सोन्याला पुन्हा झळाळी! एक वर्षानंतर सोन्याचे दर पुन्हा 50 हजार पार

जगभरात वाढती महागाई आणि शेअर बाजारातील उतार – चढाव यामुळे सोन्याला पुन्हा एकदा झळाळी आली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 50,400 रुपयांवर गेलं आहे. हा दर मागील एक वर्षाहून अधिक काळातील सर्वोच्च आहे. एक्सचेंजनुसार, सोन्याचा वायदे भाव जानेवारी 2021 नंतर सर गला आहे.

आंतरराष्ट्रीय कमॉडिटी एक्सचेंजवरही सोन्याचे दर 1900 डॉलर प्रति औंसवर पोहचले आहेत. मागील वर्षी जून 2021 मध्ये हा दर होता. 2022 मध्ये आतापर्यंत सोनं 3.6 टक्के महागले आहे. ही वाढ 2020 नंतरची सवाधिक वाढ आहे. त्यावेळी कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर सोनं रेकॉर्ड 2100 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचलं होतं.

सोनं महागण्याची 2 प्रमुख कारणे

1. पहिलं कारण म्हणजे जगभरात महागाई
मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे आहे. तर अमेरिकेत हा किरकोळ महागाईचा दर 40 वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आहे.
2. रशिया आणि युक्रेन दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे. या दोन देशांमधील तणाव एवढा वाढला आहे की, आता युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करु शकतो असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -