गेल्या वर्षी क्रिप्टोकरन्सी सतत चर्चेत होती. अनेक करन्सीनी एका वर्षात हजारो टक्के रिटर्न दिला. याशिवाय जगभरात ते झपाट्याने स्वीकारलेही जात आहे. असे मानले जाते की, या वर्षी देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये 2021 पेक्षा जास्त वाढीची शक्यता आहेत. आज आपण अशा टॉप क्रिप्टोकरन्सीबद्दल चर्चा करणार आहोत जे या वर्षी जोरदार रिटर्न देऊ शकतील. मात्र, त्याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही. क्रिप्टोकरन्सी हा अत्यंत धोकादायक गुंतवणुकीचा पर्याय आहे.
Bitcoin
जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टो मार्केटमध्ये येऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदारासाठी एक अनिवार्य होल्डिंग आहे. पीअर-टू-पीअर नेटवर्कवर ऑपरेट करणारी ही पहिली ब्लॉकचेन-आधारित क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाते. जगभरातील जवळजवळ सर्व इंडस्ट्रीजने Bitcoin ला पेमेंटचा एक प्रकार म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत बिटकॉइनची मार्केट कॅप US$771 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$26.84 बिलियन आहे.
Ethereum
Bitcoin नंतर Ethereum ही दसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. हे ओपन सोर्स ब्लॉकचेन आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत Ethereum ची मार्केट कॅप US$346.39 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$15.80 बिलियन आहे.
Cardano
2022 मधील क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी Cardano ही एक मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याच्या वेगवान ट्रान्सॉक्शनमुळे ते लोकप्रिय होत आहे. Cardano ची मार्केट कॅप फेब्रुवारी 2022 पर्यंत US$34.60 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$2.94 बिलियन आहे.
Solana
2021 मध्ये Solana सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या क्रिप्टोपैकी एक आहे. हे एक प्रूफऑफ-स्टेक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. Cardano त्याचे फ्लेक्सिबल नेटवर्क आणि लोअर एनर्जी लेवलमुळे क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे. ते Ethereum चा एक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येत आहे. Solana ची मार्केट कॅप फेब्रुवारी 2022 पर्यंत US$30.20 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$1.83 बिलियन आहे.
Binance Coin
Binance Coin हे व्हॉल्यूमनुसार जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आणि altcoin क्रिप्टो एक्सचेंजेसपैकी एक आहे. हे कोणत्याही स्मार्ट डिव्हाईसशी कम्पेटिबल आहे आणि क्रिप्टो गुंतवणूकदारांना सुरक्षितपणे ट्रेडिंग सुरू करण्यास अनुमती देते. Binance Coin ची मार्केट कॅप फेब्रुवारी 2022 पर्यंत US$66.85 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$1.69 बिलियन आहे.