Monday, December 23, 2024
Homeअध्यात्मआज आहे द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

आज आहे द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

हिंदू पंचांगानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आणि अमावस्येनंतर येणारी शुक्ल पक्ष चतुर्थी विनायक चतुर्थीच्या म्हणून ओळखली जाते. फाल्गुन महिण्याच्या कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची विधीवत पूजा केल्याने भक्तांचे दुःख दूर होते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. द्विजप्रिय सकष्टी चतुर्थी आज 20 फेब्रुवारी 2022 रोजी आहे. द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या तिथी आणि पूजाविधीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. उपवास, कथा आणि आरती करून बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाला चतुर्थी तिथी प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होते. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने भक्तांची सर्व संकटापासून मुक्ती होते आणि सुख-समृद्धी लाभते. विघ्नहर्ता गणपती भक्तांचे सर्व दुःख दूर करत भक्तांना सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करतात. त्यामुळे हिंदू धर्मात चतुर्थीला गणेश पूजन करण्याला विशेष महत्व आहे.

संकष्टी चतुर्थी शुभमुहूर्त
चतुर्थी तिथी शनिवारी रात्री 09:56 ते रविवारी रात्री 09:05 पर्यंत असेल. चंद्रोदयाची वेळ 09:50 वाजता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -