Friday, November 22, 2024
Homeबिजनेसघसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 150 अंकांनी गडगडला

घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 150 अंकांनी गडगडला

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव भारतीय शेअर बाजारवर कायम राहिला. आज (सोमवारी) शेअर बाजारात तेजी-घसरणीचं सत्र दिसून आलं. आज दिवसभरात सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे सेंन्सेक्स व निफ्टी मध्ये घसरण नोंदविली गेली. सेसेक्सवर 150 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टी 17200 अंकांच्या नजीक बंद झाला. आज निफ्टी वर मेटल इंडेक्स 2 टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक, फार्मा आणि रिअल्टी शेयरवर विक्रीचा दबाव कायम राहिला. बँक आणि फायनान्शियल इंडेक्सची निफ्टी वर समाधानकारक कामगिरी राहिली. आज सेन्सेक्स 149 अंकांच्या घसरणीसह 57,683.59 वर बंद झाला. निफ्टी 70 अंक अंकांच्या घसरणीसह 17207 वर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 21 शेअर वर घसरण झाली.

आजचे वधारणीचे शेअर्स:
• विप्रो(1.48)
• इन्फोसिस(1.39)
• श्री सिमेंट(1.35)
• पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन(1.25)
• आयसीआयसीआय बँक(0.74)

आजचे घसरणीचे शेअर्स:
• कोल इंडिया(-3.65)
• हिंदाल्को(-3.32)
• यूपीएल(-2.87)
• ओएनजीसी(-2.68)
• अदानी पोर्ट्स (-2.25)

आजच्या घसरणीच्या शेअर्समध्ये सन फार्मा, टीसीएस (TCS),आयटीसी (ITC) यांचा समावेश झाला. Paytm शेअर्सचे घसरणीचे सत्र अद्यापही कायम आहे. आज (सोमवारी) कंपनीच्या शेअर्स नीच्चांकी 816 रुपयांच्या भावावर पोहोचला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअर 833 रुपयांवर बंद झाला होता. पेटीएम शेअर इश्यू प्राईसच्या 62 टक्के आणि लिस्टिंग प्राईसच्या 47 टक्के डिस्काउंट वर ट्रेड करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -