ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोल्हापूर : चोरट्या मार्गाने गोव्यातून देशी विदेशी मद्याची वाहतूक करणारी कार पकडून चार लाखाचे मद्य व कार असा ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सिंधुदूर्ग जिल्ह्यात हमरठ गावाजवळ राज्य उत्पादनच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. यावेळी संशयीत सुनील एकनाथ गावडे (वय ३३ रा.टेंबेवाडी वागदे ता. कणकवली) यास अटक केली आहे.
कोल्हापूर विभागीय पथकाने हुमरठ गावाजवळ सापळा रचला होता. संशयास्पद कार आल्यानंतर थांबण्याचा इशारा केला. कार चालकाकडे विचारणा केली. कारची झडती घेतल्यानंतर यात ४ लाखाचे मद्य सापडले. विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.