Friday, November 22, 2024
Homenewsदिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे...

दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला. मात्र, अजूनही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. त्यातच आज भाजप आमदार नितेश राणे यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. या साऱ्या प्रकाराला दिशाचे कुटुंबीय कंटाळले असून, तिच्या आईने तर आम्हाली जगावं वाटत नाही. आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार असतील. त्यामुळे कृपा करून हे घाणेरडे राजकारण थांबवा, अशी अर्त विनवणी केलीय.

दिशा सालियानच्या आई वासंती सालियान म्हणाल्या की, दिशाच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे आम्हाला त्रास होत आहे. दोन वर्षांनंतर सर्व केस बंद झाली होती. मात्र, आता पुन्हा हे सुरू झाले आहे. याचा आम्हाला खूप त्रास होतो. आम्हाला सुद्धा आता जगावं वाटत नाही. आम्ही काही केलं तर याला हे लोक जबाबदार असतील. आम्हाला बाहेर ही जाता येत नाही. आता आम्हाला जगू द्या, अशी आर्त विनवणी त्यांनी केली.

दिशाने का केली आत्महत्या?

दिशा सालियानच्या आई वसंती सालियानची आई वासंती सालियान पुढे म्हणाल्या की, हे लोक आम्हाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आम्ही महिला आयोगाकडे तक्रार करत आहोत. असं काही झालं नाही. फक्त आमच्या मुलीला बदनाम केलं जात आहे. तर दिशाचे वडील सतीश सालियान म्हणाले की, आमच्या मुलींनी काही वेगळं काही केलं नाही. ऑफिसच्या कामाचं ताण होता. यामुळे तिने आत्महत्या केली. जे काही बोललं जातंय, अपघाती मृत्यय झाला, हे सगळं खोटं आहे. बदनाम केलं जातंय. पोस्टमार्टममध्ये जे आलंय त्यात क्लिअर आहे. मग का बदनाम करताय, मर्डर झालाय, बलात्कार झाला, असं का म्हणता, असा सवाल त्यांनी केला. शिवाय दिशाचा कुठलाही मित्र गायब झालेला नाही, असा दावाही केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -