नोकरीच्या सोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 535 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी बँकेने प्रादेशिक कार्यालय, विभागीय कार्यालय आणि केंद्रीय कार्यालय स्तरावरील पदांबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 28 फेब्रुवारी 2022 आहे. पात्र उमेदवारांनी आपल्या योग्यतेनुसार अर्ज करावा.
रिक्त पदांचा तपशील
प्रादेशिक कार्यालय स्तर – 360
विभागीय कार्यालय स्तर – 108
केंद्रीय कार्यालय स्तर – 67
असे एकूण 535 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
आवश्यक पात्रता
या पदांसाठी जे अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहे. तेच उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहे.
बँकेच्या सेवेत असतांना अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीच्या 5 वर्षा आधी कुठल्याही प्रकारची शिक्षा किंवा दंड लावण्यात आलेला नसावा.
यासह उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या निरोगी असावा. ही योग्यता असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
यासह उमेदवाराचे वय 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे. पात्र उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.
असा करा अर्ज…
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ही भरती प्रक्रिया Application for Engaging of Retired Officers of Central Bank of India अंतर्गत होत आहे. अर्जासाठी उमेदवारांना 590 रुपये फी द्यावी लागणार आहे. यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नावाचा डिमांड ड्रॅफ मुबई येथे जमा करावा लागेल.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)