Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रकंपनीतील युवतीला देवाची आळंदीला पळवून नेवून विवाह केला अन्…

कंपनीतील युवतीला देवाची आळंदीला पळवून नेवून विवाह केला अन्…

विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेले. तेथे गेल्यानंतर युवतीसोबत हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केला. याप्रकरणी युवतीला पळवून नेणाऱ्या चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात वास्तव्य करणारी एक युवती औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करते. दि. 19 ते दि. 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान संबंधित कंपनीच्या जवळ रस्त्यावर, आणि देवाची आळंदी येथून शुभम नवनाथ बरकडे (वय 21, रा. लिंब, ता. सातारा) याने तिला समक्ष व फोनवरून ‘तू मला सोडून गेलीस अथवा तू माझ्याशी विवाह केला नाहीतर तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेईन’,अशी धमकी दिली.

दरम्यान, मंगेश खंडझोडे, गौरव बरकडे (दोन्ही रा. लिंब) व अनोळखीने तिला दुचाकीवर बसवून (देहू आळंदी, जि. पुणे) या ठिकाणी नेऊन शुभम नवनाथ बरकडे याने तिच्याशी जबरदस्तीने हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केला. यानंतर याबाबतची तक्रार संबंधित युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संबंधित चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस.जी. जाधव हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -