Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगस्वस्त सोने खरेदीचा सूवर्ण संधी! जाणून घ्या RBI ची गोल्ड बॉन्ड स्कीम

स्वस्त सोने खरेदीचा सूवर्ण संधी! जाणून घ्या RBI ची गोल्ड बॉन्ड स्कीम

सोन्यात गुंतवणूक करणे नेहमीच सुरक्षित मानले जाते, कारण ते बाजारातील अस्थिरतेपासून सुरक्षिततेची हमी मिळते. तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील नागरिकांसाठी खूशखबर दिली आहे. RBI ने स्वस्त सोने खरेदी करण्याची सूवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. RBI ने सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम लॉन्च केली आहे. आज आम्ही आपल्याला या योजनेबाबत सविस्तर माहिती घेवून आलो आहे.

रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाचा परिणाम जगातील जवळपास सर्वच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. भारतातील सराफा बाजारात तर मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थिती तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्याजवळ केवळ पाच दिवस शिल्लक आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 ची दसवी सीरीज आजपासून सुरू केली आहे. ही स्कीम पुढील 5 दिवस सुरू राहाणार आहे. सरकारी गोल्ड बॉन्ड योजना 2021-22 नुसार 5109 रुपये प्रति ग्रॅम दर निर्धारित करण्यात आला आहे. गुंतवणूक करण्यास इच्छूक असलेले गुंतवणूकदार आज 28 फेब्रुवारीला अर्ज करू शकतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड बॉन्ड योजना सन 2021-22 ची 10 वी सीरीजची नोंदणी सुरू झाली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आज म्हणजेच 28 फेब्रुवारीपासून 4 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांसाठी व‍िशेष सूट दिली जाणार आहे.

RBI गोल्ड बॉन्ड योजनेनुसार आधार 5109 रुपये प्रति ग्रॅम दर निर्धारित करण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना 50 रुपये प्रति ग्रॅम विशेष सूट मिळेल. म्हणजेच सोने प्रति ग्रॅम 5059 रुपये खरेदी करता येईल.

कुठून खरेदी कराल सॉवरेन गोल्ड बॉन्ड?
स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकसोडून सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निर्धारित पोस्ट ऑफिस तसेच मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडमधून सॉवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतात.

किती वर्षांनंतर मॅच्युरिटी..
Sovereign Gold Bond ची मॅच्युरिटी 8 वर्षांची आहे. परंतु पाच वर्षांनी तुम्ही स्कीममधून बाहेर पडू शकतात. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये किमान एक ग्रॅम सोन्यासाठी गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूकदार गरजेनुसार सॉवरेन गोल्ड बॉन्डवर कर्ज देखील घेता येईल.

कोण खरेदी करू शकतो सॉवरेन गोल्ड बॉन्ड?
– भारतीय नागरिक.
– एका कुटुंबाला कमाल 4 किलोपर्यत गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतात.
– ट्रस्ट आणि संस्था कमाल 20 किलो गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकते.
– सॉवरेन गोल्ड बॉन्ड संयुक्त ग्राहक म्हणूनही खरेदी करता येते. अल्पवयीन मुला-मुलीच्या नावाने देखील या योजनेत गुंतवणूक करता येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -