Monday, November 24, 2025
Homeराजकीय घडामोडीचिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं; संजय राऊतांचा...

चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय नाट्याचा दुसरा अंक आता सुरू झालाय. पुन्हा एकदा शिवसेना  खासदार संजय राऊत आक्रमक झालेत. त्यांनी नवी दिल्ली येथे आज माध्यमांशी बोलताना भाजप सरकारवर जोरदार टीका केली. चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले आहेत, हे सुद्धा देशाला कळायला हवे, अशा शब्दांमध्ये आपला संताप व्यक्त केला. राऊत यांनी यापूर्वी मुंबईत शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवून दिली होती. विशेषतः किरीट सोमय्या यांना जोरदार घेरले होते. त्यानंतर राऊत पुन्हा एकदा आक्रमक झालेले आज दिसले.

दिल्लीत बोलताना राऊत म्हणाले की, केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू आहेत. खासकरून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया होत्यात. त्यातही महाराष्ट्रात हे प्रमाण जरा जास्तच आहे, असा दावा त्यांनी केला. जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं. हा एक रेकॉर्ड आहे. आम्ही तुम्हाला कळवलेल्ंयाचा. मुंबई महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणांवर काम करतीलच, पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्तानं कळेल, हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -