Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनJhund : बडी फिल्म बडे परदे पर, नागराज मंजुळेचा ‘झूंड’ आजपासून प्रेक्षकांच्या...

Jhund : बडी फिल्म बडे परदे पर, नागराज मंजुळेचा ‘झूंड’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

आज शुक्रवार. वर्षानुवर्ष सिनेमा रिलिज होण्याचा दिवस. खरं तर आजपासून अनेकांचा विकेंड सुरु होतो. सध्या जगभर युद्धाचे वारे वहातायत. रशिया-यूक्रेनच्या बाँम्बवर्षावांनी टीव्हीचा पडदा व्यापलाय. बेचिराख होणारी घरं, उद्धवस्त शहरं, भेदरलेली चेहरे पहाणे वेदनादायी आहे. पण म्हणून चक्र थांबत नाही. थांबणार नाही. नागराज मंजुळेचा झूंड हा त्या अविरत चालणाऱ्या चक्राचा, संघर्षाचाच भाग आहे. आज तो देशभर प्रदर्शित होतोय. काही जणांनी तर आज सुट्टी टाकलीय. ऑफिसचा बेत कॅन्सल केलाय. मराठी माणसाला नागराजनं वेगळा सिनेमा पहाण्याचं वेड लावलंय. फँड्री, सैराटनंतर आता झूंड कुठल्या पातळीवर घेऊन जाणार याची उत्सुकता सिनेप्रेमींना आहे. त्यासाठीच झूंडची प्रतिक्षा संपलीय आणि आजपासून तो तुमच्या जवळच्या थेटरात पहायला मिळणार

दगडाने ठेचून चाकूने भोसकले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

झूंड हा फूटबॉलबद्दल असल्याचं सगळे जण म्हणतायत पण मी म्हणतो हा त्यातल्या माणसांबद्दल आहे. नागराज मंजुळेंचं हे वक्तव्य सिनेमाची गोष्ट एका वाक्यात सांगण्यासाठी पुरेसं आहे. सिनेमा हा सत्यकथेवर आधारीत आहे. नागपूरातल्या विजय बारसे यांनी झोपडपट्टीतल्या काही मुलांना घेऊन जो चमत्कार घडवण्याचा प्रयत्न केला त्याचा सिनेमा आहे झूंड. अमिताभ बच्चन यांचं सर्वाधिक सिनेमात नाव कुठलं असेल तर ते आहे विजय. विशेष म्हणजे नागराजच्या झूंडमध्येही अमिताभ बच्चन विजय म्हणूनच पडद्यावर येतायत. त्यामुळे प्रेक्षकांना विजयशी स्वत:ला जुळवून घेणं नवं वाटणार नाही. मागच्या कडीची ही पुढची गोष्ट असेल.

बिग बींच्या खांद्यावर हा सिनेमा उभा असला तरी खुद्द नागराज काय दाखवणार याचीही तेवढीच उत्सुकता आहे. फँड्री, सैराटनं जी दुनिया दाखली, जग शोधलं, तसच काही वेगळं, जगा वेगळं पहायला मिळावं ह्या अपेक्षेनं प्रेक्षक सिनेमागृहात जाणार आहे. त्याची निराशा होणार नाही याची जबाबदारी नागराजची आहे. बिग बींची आहे. विशेष म्हणजे नागराजचा सिनेमा यशस्वी व्हावा अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यासाठी ते स्वत:चा खिसा रिकामा करायला तयार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -