Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रअर्धनग्न आंदोलन करुन एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा नोंदवला निषेध

अर्धनग्न आंदोलन करुन एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा नोंदवला निषेध

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नाशिकमध्ये बस डेपो क्रंमाक 1 च्या कर्मचा-यांनी आज (दि.7) राज्य शासनाच्या निषेधार्थ अर्धनग्न आंदोलन केले. राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य असल्याची शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केल्याने कर्मचा-यांनी त्रिसदस्त्रीय समितीच्या अहवालाचा निषेध यावेळी केला.


राज्य घटनेचा विजय असो, संविधानाचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा यावेळी कर्मचा-यांनी दिल्या. त्रिसदस्त्रीय समितीने अहवाल दिला असला तरी, आमची लढाई न्यायालयात सुरु आहे. आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. न्याय व्यवस्था आम्हाला न्याय मिळवूनच देईल असा विश्वास कर्मचा-यांनी व्यक्त केला. त्यामुळे आम्ही राज्य शासनाच्या निषेधार्थ हे आंदोलन करत आहोत, असे कर्मचा-यांनी सांगितले.


चार महिने झाले सरकारने आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील. येत्या निवडणुकीत आम्ही या सरकारला आमची एकजुट काय असते ते दाखवून देऊ. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार व कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात आम्ही आगामी निवडणूकांमध्ये प्रचार करु असा इशाराच या आंदोलनादरम्यान कर्मचा-यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -