Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रदेवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 6 जणांचा मृत्यू तर 15 जण गंभीर...

देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 6 जणांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी

देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. मालेगाव-चाळीसगाव महामार्गावर भीषण अपघातामध्ये 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 15 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो रस्त्यावर पलटी (Tempo Accident) झाला. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये 15 ते 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील काही रहिवासी मालेगावमधील चंदनपुरी (Chandanpuri) इथे देवदर्शनासाठी टेम्पोने आले होते. दर्शन घेऊन झाल्यानंतर सर्वजण घरी परत जात होते. त्याचवेळी मालेगाव-चाळीसगाव महामार्गावर टेम्पोला अपघात झाला. अचानक टेम्पोचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून टेम्पो महामार्गावर पलटी झाला. या अपघात इतका भीषण होता की यामध्ये टेम्पोचा चुराडा झाला आहे.

अपघातग्रस्त टेम्पोमधून 20 ते 22 जण प्रवास करत होते. अचानक झालेल्या या अपघातामध्ये जागेवरच चौघा जणांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये 15 ते 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लीलाबाई पाटील, कांतीलाल पाटील, बन्सीलाल पाटील आणि आबाजी पाटील अशी मृतांची नावं आहे. इतर दोघांची नावं समजू शकली नाहीत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -