आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारत आज आपला दुसरा सामना खेळत आहे. न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टनमध्ये हा सामना सुरु आहे. भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने धावांचे शतक ओलांडले आहे. अमेलिया कार आणि एमीची जोडी दमदार फलंदाजी करत होती. आतापर्यंत 20 षटकांचा खेळ झाला आहे. न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. नऊ धावांवर भारताला पहिलं यश मिळालं. कडक फिल्डिंगमुळे भारताला न्यूझीलंडची पहिली विकेट लवकर मिळाली. पूजा वस्त्रकरच्या शानदार थ्रो मुळे सूजी बेट्स अवघ्या पाच धावांवर रनआऊट झाली. त्यानंतर अमेलिया कर आणि सोफिया डिवाइनने डाव सावरला. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागदारी केली.
प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून
न्यूझीलंडची धावसंख्या 54 असताना भारताला दुसरं यश मिळालं. पूजा वस्त्राकरने घोषकरवी सोफिया डिवाइनला झेलबाद केलं. तिने 35 धावा केल्या. अमेलिया कार आणि एमीची जमलेली जोडी राजेश्वरी गायकवाडने फोडली. तिने अर्धशतक झळकावणाऱ्या कारला पायचीत पकडलं. ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवणार असं वाटत असतानाच राजेश्वरीने महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. मागच्या सामन्यात राजेश्वरीने आपल्या फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला होता. राजेश्वरीने 10 षटकात 31 धावा देत चार विकेट घेतल्या होत्या.




