Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रशीतपेयातून गुंगीचे औषध देत मेकअप क्लास चालकाचा विवाहितेवर बलात्कार

शीतपेयातून गुंगीचे औषध देत मेकअप क्लास चालकाचा विवाहितेवर बलात्कार

नाशिक येथील मेकअप क्लासेस चालकाने विवाहीतेला शीतपेयातून गुंगीचे औषध देवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपीने विवाहीतेचे अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मेकअप चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोडवरील आर्चिस गॅलरीच्या तळमजल्यावर सलून आणि मेकअप क्लास आहे. याठिकाणी मे २०१९ मध्ये एक विवाहिता कामानिमित्त आली असता, क्लासचा संचालक ललित निकम (वय ४९, रा. काठेगल्ली, द्वारका) याने विवाहितेला कोल्ड्रिक्समधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर सलूनमध्ये घेऊन जात या विवाहीतेवर बलात्कार केला. यावेळी त्याने विवाहितेचे अश्लिल फोटोही काढले. तसेच हे फोटो तुझ्या पतीला शेअर करणार असल्याचे धमकावत वारंवार नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केले. यातून मे २०२१ मध्ये संबंधित विवाहीतेला गर्भधारणा झाली. पुढे २८ जुलै २०२१ मध्ये गंजमाळ येथील वाघ रुग्णालयात विवाहीतेचा गर्भपात करण्यात आला. यावेळी डॉ. वाघ याने संबंधित विवाहीता माझी पत्नी असल्याची कागदपत्रात नोंदही केली.

विवाहीतेच्या इच्छेविरुद्ध हा गर्भपात करण्यात आला असून, त्यासाठी ललीत निकम व त्याची पत्नी नेहा निकम तसेच त्याचे मित्र डॉ. जयेश वाघ, त्याची पत्नी ज्योती वाघ यांनी विवाहितेला धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकारानंतरही ललित निकम याने विवाहीतेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी ललित निकम, नेहा निकम, जयेश वाघ, ज्योती वाघ यांच्याविरोदात गुन्हा दाखल केला असून, ललित निकम याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -