ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूड स्टार आणि स्टाइल आयकॉन हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. क्रिश-4 चित्रपटाचं शूटिंग लवरकच सुरु होणार आहे. हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी क्रिश 4 वर काम सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे. हृतिक सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो सैफ अली खानसोबत दिसणार आहे. हृतिक त्याच्या इतर चित्रपटांच्या शूटिंगमधून मुक्त होताच ‘क्रिश 4’चे शूटिंग (Krish 4 Shooting) सुरू होईल असे वृत्त आहे. मात्र चाहत्यांना यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
क्रिश 4’ ची कास्टिंग आणि उर्वरित तयारी यावर्षी जूनपासून सुरू होईल असा खुलासा प्रॉडक्शन हाऊसच्या एका जवळच्या सूत्राने केला आहे. मात्र आतापर्यंत या चित्रपटासाठी हृतिक रोशनसोबत कोणती अभिनेत्री असणार हे निश्चित झालेले नाही. हृतिक रोशन सध्या त्याचा आगामी चित्रपट विक्रम वेधाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो सैफ अली खानसोबत काम करताना दिसणार आहे आणि तो ऑगस्टमध्ये दीपिका पदुकोणसोबत ‘फाइटर’चे शूटिंग सुरू करणार आहे. ‘फायटर’चे शेड्यूल 100 दिवसांचे आहे. म्हणजेच ‘क्रिश 4’ पुढील वर्षी फ्लोअरवर येण्याची शक्यता आहे.