Saturday, January 11, 2025
Homeसांगलीसांगली: कवठेमहांकाळ येथील अलकूडजवळ अपघातात दोन ठार

सांगली: कवठेमहांकाळ येथील अलकूडजवळ अपघातात दोन ठार

कवठेमहांकाळ-जत रस्त्यावरील अलकूड (एस) (ता. कवठेमहांकाळ) फाट्यावर सोमवारी सकाळी छोटा हत्ती टेम्पो व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात श्रीधर सुरेश अक्की (वय 24, रा. बिजरगी, ता. जि. सोलापूर) व परसू नागाप्पा बडीवडर हे दोघे ठार झाले. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

श्रीधर व त्याचा मित्र परसू हे मोटारसायकल (केई 28, ई. व्ही. 3670) वरून जतहून कवठेमहांकाळच्या दिशेने निघाले होते. ते अलकूड (एस) फाट्यावर आले असता छोटा हत्ती टेम्पो (एम. एच. 10, सी. आर. 6052) हा रांजणीकडे जात असताना अपघात झाला.

या अपघातात गंभीर मार लागल्याने श्रीधर हा जागीच ठार झाला. तर परसू हा गंभीर जखमी झाला. परसूला मिरज येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. टेम्पोचालक राहुल हरीश कुंभार (रा. नांगोळे) याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -