मागच्या आठवड्यात सेन्सेक्स (SENSEX) सावरताना दिसला होता. निफ्टीमध्येही वाढ दिसून आली होती. या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बाजार सकारात्मक असल्यानं गुंतवणूकदरांच्या जीवात जीव आला होता. मात्र मंगळवारी शेअर बाजार (Share Market) सातशे अंकानी कोसळला आहे. त्यामुळे अडीच लाख कोटीपेक्षा जास्त रुपयांचा चुराडा झाला आहे. जागतिक घडामोडीचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवर दिसून येत आहेत. मंगळवारी 709 अंकांची घसरण झाली, तर निफ्टी 208 अंकांनी पडला आहे. 16 हजार 663 अंकावर शेअर बाजार आज बंद झाला.
दिवसभराच्या चढउतारात एक हजारपेक्षाही जास्त अंकाची पडझड पाहायला मिळाली. एटीएफसी बँकसह रिलायन्सच्या (Reliance) शेअर्समध्येही घट झाली आहे. तर फ्युचर ग्रूप आणि रिलायन्स यांच्यातील 24 हजार 713 कोटी रुपयांच्या करारावरही अद्यात स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खबरदारी बाळगत पैसे गुंतवणताना आस्ते कदम केल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालंय. फक्त सात शेअर आज तेजीत होते. तर टॉप थर्टीमधील तब्बल 23 शेअरमध्ये घट नोंदवण्यात आली आहे.
महिंद्रा एंड महिंद्रा, मारुती आणि नेस्ले इंडियाच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी पाहायला मिळाली
टाटा स्टील, कोटक महिंद्र बँक, टेक महिंद्राचे शेअर तीन टक्के घटले.
रिलाईन्सचा शेअर 2.28 टक्क्यांनी घटलाय.
एचडीएफसीचा शेअर 1.66 टक्क्यांनी पडलाय.
मंगळवारच्या पडझडीमध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप आता 251.55 लाख कोटी रुपये इतकी घसरली आहे.
गुंतवणूकदारांचे मंगळवारी 2.7 लाख कोटी रुपये बुडालेत.
पेटीएमला गळती!
गेल्या दोन दिवसांत पेटीएमचा शेअर 25 टक्क्यांपर्यंत खाली घसरलाय. मंगळवारी पेटीएमच्या शेअरमध्ये 12.71 टक्के इतकी घट झाली आहे. यामुळे पेटीएममध्ये पैसे गुंतवलेल्यांना मोठा धक्का बहसलाय. पेटीएमचा शेअर सध्या 589 रुपये इतका खाली आला आहे.