सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे आत्ताच तुमचे आधार पॅनशी लिंक करा. यासाठी भारत सरकारने 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या तारखेच्या आत तुमचे आधार आणि पॅन लिंक केले नाही तर तुमच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो.
31 मार्चपूर्वी तुम्ही आधारशी पॅन लिंक केले नाही तर सर्वप्रथम तुमचे पॅन कार्ड (PAN card) निष्क्रिय केले जाईल. असे झाल्यास तुम्हाला नवीन बँक खाते उघडणे, शेअर बाजारात गुंतवणूक करणे इत्यादी आर्थिक व्यवहार करण्यासाठी अडचण येऊ शकते. त्याच प्रमाणे इन्कम टॅक्स रिटर्न आणि व्याज भरण्यासाठी अर्ज करताना देखील तुमचे पॅन कार्ड कोट करणे अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारत सरकराने दिलेल्या मुदतीपूर्वी तुम्ही तुमचे पॅन आणि आधार कार्ड (Aadhaar card) लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड पुढील कोणत्याही व्यवहारात सादर करता येणार नाही. मात्र तुम्ही दंड भरून अंतिम मुदतीनंतर दोन्ही कार्ड लिंक करू शकता.
31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास काय होईल?
31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल, तुम्ही पुढील व्यवहारांसाठी ते वापरू शकणार नाही.
आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपये दंड होऊ शकतो.
मुदतीनंतर दोन्ही कार्ड एकमेकांना लिंक करायचे असल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार दंडाचा निर्णय अद्याप झालेला नाही.
मात्र रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की दंड 1,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
पॅन आणि आधार कार्ड लिंक केल्याशिवाय तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरू शकणार नाही.
तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार नाही. डिमॅट खाते उघडताना तुमचे पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य आहे.