ताजी बातमी ऑनलाइन टीम
गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीतच पोलिस कर्मचाऱ्यांनी मद्यपार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिक परिसरात मद्यपींचा त्रास होत असल्याच्या तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीत गेले असता तेथील पोलिसच मद्यसेवन करत असल्याचे आढळून आले.
यावेळी मद्यपी पोलिसांनी तक्रारदारास पोलिस चौकीत मारहाण करून पळ काढला. याप्रकरणी चौकशी करून पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी चौघा पोलिसांना निलंबीत केले आहे.