सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. राज्यसभेने लेजिस्लेटिव्ह, कमिटी, एक्झिकेटिव्ह आणि असिस्टंट अशा विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाटी 12वी उत्तीर्ण, पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 मे 2022 आहे. या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवरांनी या भरती प्रक्रियेअंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांशी संबंधित पात्रता, निवड प्रक्रिया इत्यादींबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.येथे दिलेल्या या https://rajyasabha.nic.in/ थेट लिंकला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात आणि पदांशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवू शकतात. तसेच उमेदवार या लिंकवर https://www.india.com/wp-content/uploads/2022/03/rajya-sabha-career-notice.pdf क्लिक करून भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव: लेजिस्लेटिव्ह, कमिटी, एक्झिकेटिव्ह, असिस्टंट
एकूण पदांची संख्या: 110
जॉब श्रेणी : केंद्र सरकारी नोकरी (Center Govt Jobs)
अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख : 19 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 मे 2022
अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण: दिल्ली
अधिकृत वेबसाइट : https://rajyasabha.nic.in/
आवश्यक पात्रता आणि निकष
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून प्रमाणपत्र अभ्याक्रम किंवा 12 वी किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले उमेदवार (Rajya Sabha Jobs 2022) या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांवर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय (Rajya Sabha Jobs 2022) 56 वर्षांपर्यंत असावे. 56 वर्षांपर्यंत वयाचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी तो आवश्यक कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्यासाठी पत्ता : Director (Personnel) Room No.240, 2nd floor, rajya sabha Secretariate, Parliament of India, Parliament House Annexe, New Delhi 110001
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)