बॉलिवूडची दिवा करीना कपूर खूप चर्चेत आहे. नुकताच करीना कपूर आणि बहीण करिश्मा कपूर आणि मुलांसोबत व्हेकेशनला गेली होती. तेथील तिने आपले व्हेकेशन फोटो शेअर केले होते. करीना आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने तिचा बिर्याणी खातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे फिटनेस फ्रिक असलेल्या करीनाने बिर्याणीवर ताव मारलाय.
करीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वत: करीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “मंडे ब्लूज बिर्याणी…आतापासूनचं उद्याचा डेजर्ट प्लॅन करत आहे.”
व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, बिर्याणी पाहून बेबो स्वत:वर नियंत्रण नाही ठेवू शकत. पटकन ती प्लेटमध्ये बिर्याणी घेते आणि बिर्याणीवर ताव मारताना दिसते. करीनाचा हा फूडी अवतार फॅन्सना आवडत आहे.
फिटनेस फ्रीक करीनाचा हा फूडी अंदाज समोर आलाय. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतोय. व्हिडिओवर फॅन्ससोबत सेलेब्रिटीजदेखील कमेंट करत आहेत. बिर्याणीचा व्हिडिओ पाहून तिची बहिण करिश्माने कमेंट दिलीय. तिने लिहिल, ‘मी या बिर्याणीला मिस केलं.’