सातारा देगाव बैलगाडी शर्यत सुरु झाल्यानंतर प्रथम एका महिलेकडून बैलगाडी शर्यतीचे नियोजन करण्यात आले आहे.
आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्यतारा केसरी बैलगाडी शर्यत आयोजित कऱण्यात आली होती.सातारा देगाव येथे अजिंक्यतारा केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचा शुभारंभ महिला आयोजिका सातारा डीसीसी बॅकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांचे हस्ते झाला.
राज्यात प्रथमच एका महिलेने बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असून शर्यत जिंकणाऱ्या बैलगाड्यांना एकुण पाच तोळे सोने सात चांदीच्या गदा बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैलगाडी शर्यतीवर बंदी उठविण्यासाठी प्रयत्न केले होते.
देशी गोधन वाचण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरु असतात याची जाणिव ठेऊन बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजिका कांचन साळुंखे यांनी दिली आहे.