Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनअजय देवगण आणि आलियाने 'RRR'साठी घेतली मोठी रक्कम

अजय देवगण आणि आलियाने ‘RRR’साठी घेतली मोठी रक्कम

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा आगामी ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. गेल्या वर्षापासून चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. येत्या शुक्रवारी प्रेक्षकांना ही धम्माल जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘आरआरआर’ हा सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे.

यात बॉलीवूडचे दोन मोठे स्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे या बिगबजेट चित्रपटात रामचरण, ज्युनियर एनटीआरसह आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी या चित्रपटासाठी किती शुल्क आकारले आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

बॉलीवूड लाइफच्या एका रिपोर्टनुसार, रामचरण आणि जूनियर एनटीआर या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत आणि यासाठी दोघांनी 45 कोटीपर्यंत फी घेतली आहे. विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे बजेट 350 कोटींपर्यंत आहे.

अजय देवगण आणि आलिया भट्ट या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे त्यांना मिळणारे शुल्कही भरमसाठ असेल असे मानले जात आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिची या चित्रपटातील भूमिका 20 मिनिटांपेक्षा कमी असली तरी खूप महत्त्वाची आहे. तिला या चित्रपटाची लीड लेडी म्हटले जात आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या भूमिकेसाठी 9 कोटी रुपये घेतल्याचा दावा रिपोर्ट्स करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -