Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगएसटी बस चालकाची आत्महत्या

एसटी बस चालकाची आत्महत्या

मागील चार महिन्यांपासून सुरू असलेला एसटीच्या संपावर (ST Employee Strike) अजूनही तोडगा निघालेला नाही. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान या संपामुळे पगार न झाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. या नैराश्येतून नाशिकमध्ये शिवनाथ ज्ञानदेव फापाळे या एसटी बस चालकाने आत्महत्या केली .

मृत शिवनाथ फापाळे हे शहापूर (ठाणे) येथे आगरात चालक पदावर कार्यरत होते .गेल्या अनेक महिन्यांपासून बस कर्मचाऱ्याचे प्रश्न सुटत नसल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी नाशिक येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -