Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगउन्हाच्या चटक्यांबरोबर महागाईच्या झळा ; गॅस सिलिंडर 957.50, पेट्रोल 102.70 तर डिझेल...

उन्हाच्या चटक्यांबरोबर महागाईच्या झळा ; गॅस सिलिंडर 957.50, पेट्रोल 102.70 तर डिझेल 87 रुपये लिटर

पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केल्याने निपाणीत पेट्रोल 102.70 रुपये तर डिझेल 87 रुपये प्रति लिटर असा दर झाला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाल्याने शहरात 957.50 रुपये सिलिंडरचा दर झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2026 रुपये झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबर महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.
दरवाढ होण्यापूर्वी पेट्रोल 101.86 रुपये तर डिझेल 85.44 रुपये प्रतिलिटर असे होते. घरगुती गॅस सिलिंडरचा दर 907.50 रुपये होता. डिलिव्हरी चार्जेस म्हणून नागरिकांकडून 20 ते 30 रुपयांची आकारणीही सर्रास केली जाते. त्यामुळे नागरिकांना स्वयंपाकाचा गॅस घेण्यासाठी एक हजार रुपये द्यावे लागतात.

बाजारात खाद्यतेलाच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे. सूर्यफुलाचा पंधरा किलोचा डबा 3000 रुपये तर सोयाबीनचा पंधरा किलोचा डबा 2800 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गॅस सिलिंडर पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत होते.
काही राज्यांतील निवडणुका पार पडल्यावर केंद्र शासनाने युक्रेन व रशिया युद्धाचे कारण पुढे करून दरात वाढ केली आहे. इंधन दरात वाढ झाल्याने मालवाहतूक दरात वाढ होते. त्यामुळे साहजिकच खाद्यतेलाबरोबरच तांदूळ, गहू, कडधान्ये व डाळीदेखील महाग होणार आहेत.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने हॉटेलमधील दर वाढले आहेत. अनेक हॉटेल व्यावसायिक घरगुती सिलिंडरचा वापर करतात. त्यांच्यावर मागील आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाई केली होती. तरीदेखील अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होतो. वाढत्या महागाईने मात्र सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

शेतमालाला मात्र दर नाही.पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने दूध उत्पादकांनी दुधाचे दर वाढले आहेत. शेतकर्‍यांच्या मालाला मात्र बाजारात कमी दर दिला जात आहे. बाजारात भाजीपाला, टोमॅटो, कांदा यांचे दर सामान्यांना परवडतील असेच आहेत. मात्र, इंधन दरातील वाढीमुळे शेतकर्‍यांना भाजीपाला शेतापासून बाजारपेठेत आणण्यासाठी इंधन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -