अल्टो कारमधून मलकापूर (ता. कराड) येथून इस्लामपूर च्या दिशेने निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पेठनाका परिसरात पेठ – सांगली मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.
दरम्यान, या अपघातात एक चिमुकली गंभीर जखमी झाले असून तिला उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. मलकापूरमधील पोळ वस्ती परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पोळ कुटुंबातील पाच व्यक्ती कारमधून प्रवास करत होत्या.
प्रवास करत असताना समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने पोळ कुटुंब प्रवास करत असलेली कार या वाहनासह पाठीमागून येणाऱ्या वाहनाच्या मध्यभागी सापडली. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मात्र असे असले तरी अपघाताची पूर्ण माहिती समोर येऊ शकलेली नाही.