Monday, December 23, 2024
Homeक्रीडाCSK vs KKR : कोलकाताची चेन्नईवर मात

CSK vs KKR : कोलकाताची चेन्नईवर मात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील वानखेडे स्टेडियमवर शनिवारपासून सुरू झालेल्या शुभारंभी आयपीएल लढतीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने विजयी सलामी दिली. या संघाने रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाला सहा गडी राखून सहजगत्या पराभूत केले. कोलकातापुढे विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यांनी ते 18.3 षटकांत आणि चार गड्यांच्या मोबदल्यात आरामात पार केले. त्याचबरोबर कोलकाताने दोन गुणांची कमाई केली.


कोलकाताकडून अजिंक्य रहाणेने 44 तर व्यंकटेश अय्यरने 16 धावांचे योगदान दिले. विजयी संघाने 43 धावांची सलामी दिली. नितीश राणा याने चमकदार 21 धावा केल्या. रहाणेने 34 चेंडूंचा सामना करताना अर्धा डझन चौकार व एक उत्तुंग षटकार खेचला. अय्यरने दोन चौकार ठोकले तर राणा याने दोन चौकार व एक षटकार लगावला. नंतर सॅम बिलिंग्जने 22 चेंडूत 25 धावा टोलवल्या. त्याने एक चौकर व एक षटकार ठोकला. ड्वेन ब्राव्होने त्याला तुषार देशपांडेकरवी झेलबाद केले.

कर्णधार श्रेयस अय्यर याने एक बाजू लावून धरताना 19 चेंडूत 20 धावा केल्या. या संयमी खेळीत त्याने फक्त एकदाच चेंडूला सीमारेषेची दिशा दाखवली. शेल्डन जॅक्सन याने नाबाद 3 धावा केल्या. चेन्नईकडून ब्राव्होने 3 आणि मिशेल सँटनर याने 1 गडी बाद केला. त्यापूर्वी गोलंदाजांनी केलेल्या धारदार मार्‍यापुढे चेन्नईची फलंदाजी साफ कोलमडली.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने केलेल्या अर्धशतकी टोलेबाजीमुळेच चेन्नईला 5 बाद 131 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. हा निर्णय कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक ठरवला. कारण चेन्नईची सुरुवातच अडखळत झाली. फलकावर फक्त दोन धावा लागलेल्या असताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड भोपळाही न फोडता उमेश यादवची शिकार ठरला. नितीश राणाने त्याचा झेल टिपला. पाठोपाठ डेव्हॉन कॉन्वे याने तीन धावा केल्यानंतर तंबूचा रस्ता धरला. फलकावर तेव्हा 28 धावा लागल्या होत्या.


मग रॉबिन उथप्पा हा स्थिरावत आहे, असे वाटत असतानाच बाद झाला. चेन्नईने तेव्हा 49 धावा केल्या होत्या. वरुण चक्रवर्तीने उथप्पाला पुढे येण्यास भाग पाडले व यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सन याने विलक्षण वेगाने बेल्स उडवल्या. उथप्पाने 21 चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह 28 धावांची चटपटीत खेळी केली. पाठोपाठ 15 धावा करून अंबाती रायुडू हाही धावबाद होऊन तंबूचा रस्ता धरता झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -