Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रभरधाव ट्रकने चिरडलं, चार वर्षांच्या चिमुरड्याने वडिलांदेखत प्राण सोडले

भरधाव ट्रकने चिरडलं, चार वर्षांच्या चिमुरड्याने वडिलांदेखत प्राण सोडले

ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगांव शहरातील (Malegaon Nashik) पवारवाडी शिवारामध्ये रझा चौकात हा प्रकार घडला. वडिलांसोबत पायी निघालेल्या चिमुकल्याला भरधाव ट्रकने चिरडले. अपघातात चार वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. हाफिजूर रहेमान अन्सारी असं मयत बालकाचं नाव आहे. वडिलांच्या डोळ्यादेखतच चिमुरड्याने प्राण सोडले. चिमुकल्याच्या मृत्यूने (Child Death) कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव ट्रकमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्या वाढल्याने मालेगाववासियांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगांव शहरातील पवारवाडी शिवारामध्ये रझा चौकात ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या सोबत दवाखान्यातून परत येत असताना हा अपघात झाला.

ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू
रझा चौकात बापलेक चालत येत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली दबला गेल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. हाफिजूर रहेमान अन्सारी असे 4 वर्षांच्या बालकाचे नाव आहे.

भरधाव ट्रकमुळे वाढते अपघात
काही महिन्यांपूर्वीही ट्रक खाली चिरडून एक मुलाचा मृत्यू झाला होता. मालेगाव शहरात अशाच पद्धतीने भरधाव ट्रकचा वावर असल्याने या घटना होत आहेत. शहराबाहेर ट्रक टर्मिनल बनवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -