Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमोठी दुर्घटना टळली! दिल्ली एअरपोर्टवर SpiceJet विजेच्या खांबाला धडकले

मोठी दुर्घटना टळली! दिल्ली एअरपोर्टवर SpiceJet विजेच्या खांबाला धडकले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) आज एक मोठा अपघात झाला आहे. स्पाईसजेटचे विमान (SpiceJet Flight Accident) दिल्ली विमानतळावर विजेच्या खांबाला धडकले. या अपघातामध्ये विमान आणि खांबांचे मोठे नुकसान झाले आहे.

ही टक्कर पुशबॅक दरम्यान घडली म्हणजेच हे विमान पॅसेंजर टर्मिनलवरून धावपट्टीवर नेले जात होते त्यावेळी हा अपघात घडला. अपघाताबाबत बोलताना विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली (Delhi) विमानतळावर विमानाच्या पुशबॅक दरम्यान स्पाईसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले. या अपघातामध्ये विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर प्रवाशांसाठी विमान बदलण्यात आले. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, चौकशी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्पाईसजेटचे विमान एसजी 160 हे दिल्लीवरून जम्मूला जाणार होते. याचदरम्यान हा अपघात घडला आहे.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, स्पाईसजेटचे विमान एसजी 160 हे दिल्लीवरून जम्मूला जाणार होते. याचदरम्यान हा अपघात घडला. ही टक्कर पुशबॅक दरम्यान घडली म्हणजेच हे विमान पॅसेंजर टर्मिनलवरून धावपट्टीवर नेले जात होते त्यावेळी हा अपघात घडला. अपघातानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -