ताजी बातमी ऑनलाइन टीम
पुणे: सध्या क्रीडा क्षेत्रात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा (IPL) उत्साह आहे. क्रिकेट फॅन्स एकापेक्षा एक सरस, रोमांचक क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहेत. यंदाचा आयपीएलचा 15 वा हंगाम आहे. मुंबई आणि पुण्यात आयपीएलचे सामने सुरु आहेत. टी 20 क्रिकेटकडे वेग, मनोरंजन आणि ग्लॅमर म्हणून पाहिलं जातं. सध्या या तिन्ही गोष्टी स्टेडियममध्ये पहायला मिळत आहेत. फलंदाजांच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे.
त्याचवेळी स्टेडियममधले ग्लॅमरस चेहरे लक्ष वेधून घेत आहेत. काल गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (GT vs DC) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर (Pune Mca Stadium) आयपीएलमधला 10 वा सामना पार पडला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यात पहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्सने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती.
एकवेळ दिल्ली कॅपिटल्स हा सामना जिंकणार असं वाटत होतं, पण मोहम्मद शमी, राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीला 157 धावाच करता आल्या. गुजरातने 14 धावांनी आयपीएलमध्ये सलग दुसरा सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समधील लढत आणखी एका वेगळ्या कारणासाठी सुद्धा चर्चेत आली. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षक गॅलरीत बसलेले एक कपल किसींग करताना दिसले.
‘हे कपल आयपीएल मॅचला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलं’, असं एका युजरने लिहिलं आहे. ‘माझा देश बदलतोय, पुढे जातोय’, असं दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात चौथ षटक संपल्यानंतर किसींग करतानाचा हा फोटो आहे. त्यावेळी दिल्लीच्या एक विकेट गमावून 32 धावा झाल्या होत्या. पृथ्वी शॉ आणि मनदीप सिंह क्रीजवर होता. दिल्लीच्या टीमने नऊ विकेट गमावून 157 धावा केल्या.