Sunday, February 23, 2025
Homeब्रेकिंगमुलगी असल्याचं भासवलं, प्रेयसीच्या नवऱ्याशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून हत्या

मुलगी असल्याचं भासवलं, प्रेयसीच्या नवऱ्याशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून हत्या

ताजी बातमी ऑनलाइन टीम

प्रियकराने प्रेयसीच्या पतीची हत्या (Girlfriend’s Husband killed) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झारखंडमधील धनबादमध्ये हा प्रकार घडला आहे. पान मसाला व्यापारी मुकेश पंडित यांची 26 मार्च रोजी हत्या करण्यात आली होती. गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. धनबाद पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. मुकेश यांची पत्नी नीलम देवी आणि तिचा प्रियकर उज्ज्वल शर्मा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फेसबुकवर मुलीच्या नावे अकाऊण्ट ओपन करत पंडित यांना उज्ज्वलने भेटायला बोलावरले होते. त्यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या (Jharkhand Crime) केली. उज्ज्वलकडून पोलिसांनी पिस्तूल आणि मुकेश पंडित यांचा मोबाईल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.


काय आहे प्रकरण?
मुकेश पंडित यांच्या घराजवळच उज्ज्वल शर्माचं घर होतं. उज्ज्वल त्यांच्या दुकानात काम करत होता. त्यामुळेच पंडित यांच्या घरी उज्ज्वलचं येणं-जाणं वाढलं. दरम्यानच्या काळात उज्ज्वल आणि नीलम देवी यांची ओळख वाढली. त्याचं रुपांतर प्रेमात झालं. मुकेश पंडित यांच्या कानामागे दोघांचं प्रेम प्रकरण सुरु होतं.

प्रेम-प्रकरणात काटा
मुकेश पंडित हा दोघांनाही त्यांच्या रस्त्यातील काटा वाटू लागला. त्यामुळे त्याला वाटेतून दूर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उज्ज्वल आणि नीलम या दोघांनीही मुकेशची हत्या करण्याचं ठरवलं.

मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊण्ट
उज्ज्वल शर्माने मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊण्ट तयार केलं. मुकेश पंडित यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यांनी ती स्वीकारताच त्यांच्याशी मेसेंजरवर चॅटिंगला सुरुवात केली. हळूहळू मैत्री वाढवून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 25 मार्चच्या रात्री उज्ज्वलने मुकेश यांना मेसेज करुन भेटायला बोलावलं. दामोदरपूर फुटबॉल ग्राऊण्डवर भेट झाल्यानंतर त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -